जाहिरात विवरण

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातून (सीबीएसई)दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर याच मंडळातून अकरावी आणि बारावी देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे. यामुळे राज्य मंडळाच्या अकरावी प्रवेशासाठी होणारी या विद्यार्थ्यांची स्पर्धा तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. दहावीपर्यंत सीबीएसईतून शिक्षण घेऊन अकरावी व बारावीसाठी राज्य मंडळातील कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. यामुळे या मंडळाच्या परीक्षेत ९० किंवा ९५हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली की राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबरोबर अकरावी प्रवेशासाठी चढाओढ वाढत असे. यंदाही ही चढाओढ असेल, मात्र त्याचे प्रमाण थोडे कमी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंडळाऐवजी सीबीएसईच्या ज्युनिअर कॉलेजांमधूनच अकरावी, बारावीचे शिक्षण घेण्याकडे या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. या विद्यार्थ्यांमुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे राहतात, अशी ओरड दरवर्षी होत असते. यातूनच 'बेस्ट ऑफ फाइव्ह'चा पर्याय समोर आला आणि त्यानुसार प्रवेश देण्यास सुरुवात झाली. हे बदल झाले तरी चढाओढ कायम राहिली. गेल्या वर्षी सीबीएसई मंडळातून राज्य मंडळात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.२५ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले. हे विद्यार्थी पुन्हा सीबीएसई मंडळात प्रवेश घेऊ लागले आहे. विशेषत: विज्ञान शोखेतील विद्यार्थी त्याच मंडळातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात. कारण विज्ञान शाखेतून इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या जेईई आणि नीटच्या परीक्षेत सीबीएसईच्या अभ्यासावर आधारित प्रश्न येतात. तसेच या विद्यार्थ्यांना येथील परीक्षापद्धतीची सवय झालेली असते. यामुळे प्रवेश परीक्षांच्या तणावात मंडळ बदल करून तेथील अभ्यास शिकणे आणि पद्धती समजून घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा थेट इन हाऊस कोट्यामधून या ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेश घेणे विद्यार्थी पसंत करू लागले आहेत हे सातत्याने दिसून येत आहे.


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.