जाहिरात विवरण

शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (परिक्षा व प्रशिक्षण) GDC&A Examination: शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या मार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये राज्यात एकूण 16 केंद्रावर या परिक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परिक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत - जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, 1) मुंबई ब्रांदा (पूर्व)(3), 2) ठाणे 3)नाशिक 4)जळगाव, 5) अहमदनगर, 6) पुणे, 7) सोलापूर, 8) सातारा, 9) सांगली, 10) कोल्हापूर, 11) औरंगाबाद, 11) लातूर, 13) अकोला, 14) अमरावती, 15) नागपूर, 16) चंद्रपूर. CHM Examination: सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी / कर्मचारी यांना पूर्णत: सहकारी गृहनिर्माण कायदा तसेच इतर अनुषंगिक कायदे (उदा. लेखापरीक्षण, व्यवस्थापन, हौसिंग नियम, मॅन्युअल, आदर्श उपनिधी इ.) ची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी “सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रमाणपत्र” (Certificate in Co-operative Housing Management) सुरु करण्यात आलेला आहे. या परिक्षांची अधिसूचना प्रत्येक वर्षाच्या जानेवारी मध्ये प्रसिध्द करण्यात येते आणि संबंधीत केंद्रावर परिक्षा अर्ज स्विकारण्यात येतात. या संबंधी अधिक माहिती आपल्या जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अथवा तालुक्यांचे उप निबंधक, सहकारी संस्था / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात मिळू शकेल. पात्रता विषयक अटी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असला पाहीजे किंवा उमेदवार किमान एस.एस.सी. अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याची सहकार खाते, कृषि उत्पन्न बाजार समिती अथवा कोणत्याही एका सहकारी संस्थेमध्ये, अर्ज करण्याच्या दिनांकास कनिष्ठ लिपीक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पदावर, एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 5 वर्षे अथवा एच.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्षे सेवा पूर्ण झाली असली पाहीजे. तसेच तो सदर संस्थेत कार्यरत असून कायम होण्याची शक्यता असली पाहीजे. अर्ज करण्याच्या दिनांकास अर्जदार संस्थेमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. यापूर्वी जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या व या परीक्षेस पुन्हा बसू इच्छिणा-या उमेदवारांसाठी नमूद करण्यात येते की, त्यांना पूर्वी परीक्षेस बसले असताना ज्या विषयात 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विषयात त्यांना बदललेल्या अभ्यासक्रमानुसार व मंडळाच्या नियमानुसार सूट (एक्झमशन) मिळू शकेल, परंतु त्यासाठी पूर्वीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स (साक्षांकित) प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच अशी सूट मिळण्याची मागणी अर्जात स्पष्टपणे नमूद न केल्यास सदर विषयास या परीक्षेत अथवा त्यापुढील परीक्षेत सूट मिळणार नाही. सन 2001 व त्यापूर्वी जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना कोणतीही सूट मिळणार नाही.


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.