जाहिरात विवरण

*खुषखबर खुषखबर खुषखबर* *सहकारी व खाजगी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी बंधू-भगिनीं करीता केंद्र सरकारचे श्रम व रोजगार मंत्रालय यांचे Office Memorandum No. CAIU/011(16)2020-21/ABRY/1178 Dated - 31.12.2020 या अध्यादेश नुसार नविन भविष्य निर्वाह निधी नोंदणी करणार्यानाआत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) अंतर्गत 24% लाभ मिळणार.* ......... ============================= *आत्मनिर्भर भारत रोजगार योजना* (ABRY) बद्दल थोडक्यात पण महत्त्वाचे : मा. अर्थ मंत्री, भारत सरकार यांनी नुकताच अर्थ व्यवस्थेला गती मिळणे व रोजगार निर्मिती होणे करीता आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) जाहीर केली आहे. सदर योजनेचे अध्यादेश व मार्गदर्शक नियमावली ही 31.12.2020 रोजी शासनाने प्रसिद्ध केला आहे. सदर ABRY या योजनेचा लाभ नविन भविष्य निर्वाह निधी नोंदणी करणार्या संस्थेस व कर्मचारी यांना दोन वर्षे पर्यंत पगाराच्या प्रत्येकी 12% + 12% = 24% या प्रमाणे लाभ मिळणार आहे. या करीता आपली संस्था Employees' Provident Fund & Miscellaneous Provisions Act-1952 या कायद्या अंतर्गत Online रजिस्टर करणे गरजेचे आहे. व त्या करीता संस्थेची Digital Signature असणे गरजेचे आहे. सदर कायद्या अंतर्गत रजिस्टर केले नंतर सदर संस्थेला एक P.F. Code Number मिळेल व सदर कायद्याचे अंमलबजावणी करणे करिता Login व Password आपण दिलेल्या Mobile वर येईल. यानंतर संस्थे मध्ये काम करणारे कर्मचार्याचे सुद्धा रजिस्टेशन करून प्रत्येक कर्मचार्याना एक Universal Account Number (UAN) प्राप्त होतो त्या करीता प्रत्येक कर्मचार्याचे पूर्ण जन्म तारीख असलेले आधार कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक UAN चे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) अंतर्गत रजिस्टरेशन करावे लागते. ज्या कर्मचार्याचा मासिक पगार 14,999/- पेक्षा कमी आहे व UAN या पूर्वी मिळाला नाही अशा सर्वांचे *आत्मनिर्भर भारत रोजगार योजना* (ABRY) अंतर्गत रजिस्टेशन होईल व सदर योजनेचे लाभ मिळेल. सदर E.P.F. & M.P. Act-1952 कायद्याची अंमलबजावणी करणे त्या संस्थेला बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी. त्या करीता रजिस्टरेशन करणे पूर्वी हा कायदा आपल्या संस्थेला स्वेच्छेने लागू करण्यात यावा या करीता संचालक मंडळाला ठराव मंजूर करावा लागतो. या कायद्या अंतर्गत खालील तीन योजनेचा समावेश आहे. 1) *Employees Provident Fund Scheme.* 2) *Employees Pension Scheme.* 3) *Employees Deposit Linked Insurance Scheme.* म्हणजे 1) भविष्याची सुरक्षित तरतूद व त्यावर चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज जे सध्या 8.50 % आहे. 2) स्वतः कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यास मासिक पेन्शन व त्याचे पश्चात पत्नी/पती व 25 वर्षे पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना पेन्शन मिळते. 3) सात लाख रूपये पर्यंत चा विमा. हा भविष्य निर्वाह निधी कायदा, 1952 (EPF & MP Act ,1952) केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो व त्या वर Labour Ministry तसेच Finance Ministry चे नियंत्रण आहे. कायदा लागू झाले नंतर संस्थेला दरमहा अॅडमिस्ट्रेशन चार्जेस रूपये 500/- व एम्पालाईज डिपाॅझीट लिंक्ड इन्शुरन्स स्किम चे (पगार × 0.5%) ही रक्कम चलना द्वारे Online भरावी लागणार आहे याची सुद्धा नोंद घ्यावी. *आपल्या गावातील, जवळच्या पतसंस्था, दूधसंस्था,पाणीपुरवठा, तसेच सेवा सोसायटी मध्ये कार्यरत कर्मचारी/संस्था यांचा यामध्ये चांगला फायदा होईल........* 🖍️🖍️🖍️🖍️🖍️🖍️🖍️www.mundejobs.com 🖍️🖍️🖍️


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.