जाहिरात विवरण

*जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम: जगामध्ये चहा पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.चहा हे गरम पेय असून ते उत्तेजक आहे.चहा मुळे थकवा जातो आणि तरतरी येते त्यामुळे चहाची सवय लागते. आणि ही सवय तोडणे कठीण असते चहामध्ये कॅफीन नावाचे अल्कलॉइड असते. कोकेनसारखी कॅफीन ची सुद्धा सवय लागते.कारण ते मज्जासंस्थेला उत्तेजित करते.उत्तेजित पणा अल्प काळापुरताच असतो,पण त्याचा प्रभाव संपल्यावर चिडचिडेपणा,निरुत्साह,डोके दुखणे,अस्वस्थपणा,निद्रानाश अशी लक्षणे दिसतात. यावरून दिसते की चहा आरोग्याला अपायकारक आहे. संपूर्ण जगामध्ये चहाचा खप इतका आहे की आर्थिक फायद्यासाठी आपल्याच शरीरात विष पसरवीत आहोत हे लक्षात सुद्धा येत नाही. संपूर्ण जगात दिवसभरातून कोट्यावधी कप चहा घेतला जातो,भारतात तर रोज-"चाय पियो,बहुत दिन जियो.."अशा जाहिराती सुद्धा बघायला मिळतात.त्यामुळे चहा आरोग्याला चांगला असतो असा गैरसमज तयार होतो. चहा ही वनस्पती कॅमेलिया कुळातील आहे.चीनमध्ये ई.पू. चौथ्या शतकापासून चहाची लागवड होत आहे.सहाशे वर्षापासून हळूहळू सुधारणा होत सध्याची चहा करण्याची पद्धत रूढ झाली आहे. भारतामध्ये 1940 पर्यंत चहा लोकप्रिय नव्हता. दुसऱ्या महायुद्धामुळे भारतात सुद्धा महागाई वाढली.दूध घेणे परवडेना, म्हणून लोकांनी चहा हा पर्याय निवडला. *दुष्परिणाम: चहा आरोग्याला घातक आहे. भारतातील प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ पी. सी. रॉय तर म्हणतात की,चहा घेणे म्हणजे विष घेण्यासारखे आहे.त्यामुळे तरतरी येते. कॅफीन मुळे मज्जासंस्था उत्तेजित होते म्हणून कॅफिनचा परिणाम मेंदूतील इतर भागांपेक्षा सेरेब्रल नावाच्या भागावर जास्त होतो म्हणजे बुद्धिमत्ता आणि मानसिक भावनांवर होतो म्हणून तरतरी येते आणि काम करण्याची क्षमता वाढते. * चहाचे दुष्परिणाम खालील प्रकारचे आहेत: 1)अपचन: चहामुळे पचनशक्ती मंद होते.तोंडातील लाळेमध्ये स्टार्चचे पचन करणारे टायलिन नावाचे एंझाईम असते चहामुळे हे एंझाइम नष्ट होते.त्यामुळे अपचन होते.टॅनिन मुळे आमाशयात सुद्धा अन्नाचे पचन होत नाही.चहा मुळे पोटात गॅस होतो.जुलाब होतात किंवा बद्धकोष्ठ होते. 2)मूत्रपिंडविकार: चहातील कॅफीन लघवी जास्त निर्माण करणारे आहे. पाच सहा कप चहा घेतला तर लघवीचे प्रमाण चारशे ते पाचशे टक्के वाढते. त्यामुळे मूत्रपिंडावर ताण पडतो त्यामुळे मुतखडे होण्याची शक्यता असते कारण त्यात ऑक्झलेट असतात. 3)आर्तवपूर्व लक्षण समूह: मासिक पाळी येण्यापूर्वी पोट दुखणे, कंबर दुखणे इत्यादी लक्षणे असतात ती चहा जास्त प्रमाणात घेतल्यास वाढतात. 3) मुत्रविसर्जन: चहा जास्त प्रमाणात घेतल्यास लघवीला जास्त वेळा जावे लागते. कॅफिन मुळे मूत्राशयाचा संकोच होतो. त्यामुळे लघवीला जाण्याची इच्छा होते. कॅफिन मुळे मेंदूतील श्वसन आणि हृदय या केंद्रांवर सुद्धा वाईट परिणाम होतात.कोरोनरी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तप्रवाह वाढतो, चहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, श्वसनाचे प्रमाण वाढते.कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमी होते आणि शरीरातील उष्णता 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढते.यावरून चहा हे आरोग्याला अपायकारक आहे हे सिद्ध होते. डॉ.सतीश कदम. श्री साई क्लिनिक, अहिल्यानगर सांगली . https://chat.whatsapp.com/HTnvJlElRncHsIt9MIXFry


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.