जाहिरात विवरण

सरकारने लर्नर लायसन्सच्या प्रक्रियेतसुद्धा बदल केला आहे. यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.मुंबई - राज्यात आता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं सोपं झालं आहे. मंगळवारी राज्य सरकारने 50 विभागिय वाहतूक कार्यालयांसाठी दोन आदेश जारी केले आहेत. यामध्ये पहिल्या आदेशानुसार लर्निंग लायनन्ससाठी आता लोकांना घरबसल्या फक्त आधार कार्डच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. तसंच याची टेस्टसुद्दा ऑनलाइन घेतली जाणार आहे. आधार कार्डवरून व्यक्तीची ओळख पटवण्यात येईल आणि घरबसल्या लर्निंग लायसन मिळेल. दुसऱ्या आदेशात डीलर्सना आता नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांच्या नोदणीसाठी आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही. तेसुद्धा आधार व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून शक्य आहे. महाराष्ट्राचे वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत माहिती देतील. या सुविधा सुरु झाल्यानंतर आरटीओमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. यामुळे भ्रष्टाचार आणि एजंटच्या माध्यमातून लायसन्स देण्याचं कामही बंद होईल. लोकांचा वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टी वाचतील. लायसन्स रिन्यू करण्यासाठी, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसह 18 कामांसाठी आता आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून होईळ. या वर्षी मार्चापासूनच या सुविधांसाठी आधारचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र वाहतूक विभाग दर वर्षी 20 लाखांहून अधिक लर्निंग लायनन्स जारी करण्यात येतात. तर इतक्याच दुचाकी आणि नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांचे रजिस्ट्रेशन दरवर्षी होते. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने वाहन 4.0 आणि सारथी 4.0 सिस्टम तयार केली आहे. याच्या माध्यमातून नोंदणी आणि लर्निंग लायसन्स जारी केले जात आहे. आता आधार कार्ड नंबर आणि ऑनलाइन टेस्ट देताच लर्निंग लायसन्स मिळणार आहे. नव्या सिस्टिमनुसार टेस्टमध्ये तुम्हाला रोड सेफ्टी संदर्भात काही व्हिडिओ दिसतील. यानंतर तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल. ज्यामध्ये 60 टक्के गुण मिळवल्यास लायसन दिले जाईल. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सस तयार करण्यासाठी आणि रिन्यूबाबत नविन गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार लर्नर लायसन्स मिळवण्याची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन होईल. अर्ज करण्यापासून ते लायसन्सच्या प्रिंटिंगपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. यासोबत इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंटसचा वापर होणार आहे. यातून मेडिकल सर्टिफिकेट, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, रिन्यूअल यांसाठी वापर होईल. नव्या नियमावलीचा हाच उद्देश आहे की, नव्या गाडीच्या रजिस्ट्रेशनची नोंदणी प्रक्रियासुद्धा सुलभ करता येईल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा रिन्यूअल आता 60 दिवस आधीच करता येणार आहे. याशिवाय टेम्पररी रजिस्ट्रेशनचा कालावधीसुद्दा एक महिन्यावरून 6 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच सरकारने लर्नर लायसन्सच्या प्रक्रियेतसुद्धा बदल केला आहे. यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. हे काम ट्युटोरियलच्या माध्यमातून घरबसल्या होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यामुळे मोठा दिलासा मिळाला


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.