जाहिरात विवरण

औरंगाबाद: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना(प्रत्येक वर्ष 12 हजार रुपये )National Means Cum-Merit Scholarship, NMMS) परीक्षा जूनमध्ये होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार ६ एप्रिलपासून सुरू झाली. २६ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. परीक्षा १९ जून रोजी होणार आहे. करोनामुळे एनएमएमएस विविध परीक्षांचे वेळापत्रक लांबले. इयत्ता आठवीसाठी २०२१-२२ एनएमएमएस परीक्षेचे वेळापत्रक कधी येते याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार १९ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. २००७-०८पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. www.mscepune.in आणि https://nmmsmsce.in या वेबसाईटवर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नियमित शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह २७ एप्रिल ते १ मेपर्यंत तर अतिविलंब शुल्कानुसार २ ते ६ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्याच्या पालकाला २०२०-२१च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागेल. सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असावा. तर विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालयात, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी परीक्षेला अपात्र आहेत. लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड होते. पात्र विद्यार्थ्यांना दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/JdlEZnfvAxY7WCDmMHUSIj


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2021-22)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२१-२२)



 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.