जाहिरात विवरण

'ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम' हा या मिशनच्या अंमलबजावणीतील एक महत्वाचा घटक असणार आहे. प्रत्येक गावासाठी एका फेलोची नेमणूक केली जाईल आणि तो फेलो कार्यक्रमाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार राहील. माननीय मुख्यमंत्र्यांकडून सर्व फेलोजना पाठबळ देण्यात येईल कि ज्याचे योग्य वेळेत गावांचा विकास करण्यामध्ये फेलोजना साहाय्य होईल.


पात्रता निकष

निवडीसाठीचे पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत:

    अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षाच्या मध्ये असायला हवे.
    मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुण प्राप्त केलेले, कोणत्याही शाखेचे पदवीधर /पदव्युत्तर पदवीधर या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. तसेच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी ची मान्यता असलेल्या भारताबाहेरील विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले पदवीधर/पदव्युत्तर सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.
    कामाचे स्वरूप लक्षात घेता उमेदवारास कोणत्याही शासकीय रुग्णालयातून शारीरिक पात्रतेची तपासणी करणे आवश्यक राहील.


निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया दोन टप्यात राबवली जाईल.

पहिल्या टप्यात उमेदवारांना रेज़्यूमे, दिलेल्या ३ विषयांवर संक्षिप्त निबंध (मराठी/इंग्रजी/हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत) लिखाण व वैयत्तिक माहिती संदर्भातील एक गूगल फॉर्म देखील भरावा लागेल. पहिल्या टप्यात निवड झालेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत दुसऱ्या टप्यात घेण्यात येईल.


कामाचे स्वरूप

गावांमध्ये ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित गावामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या फेलोची असेल. नियुक्त करण्यात आलेल्या फेलोंची प्रमुख भूमिका खालील प्रमाणे असेल:

    गावात विकास घडवून आण्यासाठी, गावकऱ्यांच्या वर्तवणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.
    शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या योजना आणि विकास कार्यांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचवणे.
    कॉर्पोरेट, शासन आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणे.
    ग्रामीण भागात प्राथमिक सर्वेक्षण करणे.


नियुक्त करण्यात आलेल्या फेलोंची जबाबदारी खालील प्रमाणे राहील.

    जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि मुख्यमंत्री कार्यालय यांमध्ये समन्वय साधणे.
    ग्रामीण विकास योजनेवर त्या गावातील ग्रामपंचायती सोबत काम करणे.
    गावात सामाजिक व आर्थिक विश्लेषण करून गावकऱ्यांच्या खऱ्या गरजांचा शोध घेणे.
    स्थानिक प्रशासनाला नियोजनामध्ये सहाय्य करणे.
    जिल्हा प्रशासनाकडून अधिक चांगल्या सेवा सुविधा कशा पद्धतीने पुरवल्या जाऊ शकतील यासाठी आवश्यक ते संशोधन करणे.
    स्वयं सहायता गट (एसएचजी) आणि पंचायत यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.
    मनरेगा, स्वच्छ भारत अभियान, आयसीडीएस यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या अधिक चांगल्या अंमलबजावणीसाठी सहाय्य करणे.
    नाविन्यपूर्ण योजनांचा आराखडा तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
    ग्रामीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबतचा अभिप्राय कार्यकारी समिती आणि प्रशासकीय परिषद यांना देणे.


प्रशिक्षण कार्यक्रम

ग्रामीण पातळीवर सर्व कार्य उत्तम रित्या पार पाडण्यासाठी फेलोजना व्यापक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फेलोजला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या वर्तमान कौशल्यांमध्ये वाढ होईल; तसेच ते स्वतःला एक गुणवत्तापूर्ण व्यावसायिक म्हणून घडवू शकतील. काम सुरु करण्यापूर्वी फेलोजसाठी, टिस (टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस) आणि आयआयटी बॉम्बे- सीतारा (द सेंटर फॉर टेकनॉलॉजि अल्टरनेटिव्हस फॉर रूरल एरियाज) द्वारे एक 'ओरिएंटेशन प्रोग्रॅम' आयोजित करण्यात येईल ज्याद्वारे फेलोजला ग्रामीण स्तरावर नियोजन करणे सोपे जाईल.

प्रत्येक फेलोसाठी एका मार्गदर्शकाची नेमणूक करण्यात येईल जो त्या फेलोला संपूर्ण १२ महिन्यांसाठी मार्गदर्शन देईल आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास साहाय्य करेल. मार्गदर्शकांमध्ये शासकीय अधिकारी, शैक्षणिक क्षेत्र व विविध कॉर्पोरेट्स मध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांचा समावेश असेल.


मानधन

कार्यक्रमाच्या कालावधीत प्रत्येक फेलोला दरमहा रु. ३०,०००/- मानधन दिले जाईल.
https://www.maharashtra.gov.in/cmrdfp2016/fpm.html


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.