जाहिरात विवरण

सैन्यदल अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी


भूदल, हवाईदल आणि नौदल या सशस्त्र सैन्यदलांमध्ये सेवा करणे, ही सर्वात सन्मानाची आणि गौरवाची बाब समजली जाते. उमेदवारास ही संधी प्राप्त व्हावी यादृष्टीने राज्य शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षणाचे नाशिक येथे आयोजन करण्यात येते. 

कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीय नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्य दलात नोकरी करण्याची संधी मिळू शकेल, अशा उमेदवारांसाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी राज्य शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय, परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 6 ते 15 मार्च दरम्यान छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात होणाऱ्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे.

प्रशिक्षण वर्गाचा कालावधी दिनांक 06 मार्च 2017 ते 15 मार्च 2017 (एकूण 10 दिवस) असा आहे. या प्रशिक्षण कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामूल्य करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी दि. 04 मार्च 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींसह मुलाखतीस हजर रहावे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक-0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत (सकाळी 10.00 ते सायं. 5.30) संपर्क साधावा.
9975603050

प्रवेशासाठी पुढीलपैकी एक पात्रता आवश्यक

१. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन (UPSC) उत्तीर्ण व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

२. एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.

३. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉललेटर असावे.

4. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.