जाहिरात विवरण

आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी सहाय्य व्हावे यासाठी शासनाने त्यांच्यासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आरक्षण उपलब्ध करुन दिले आहे. तसेच काही ठिकाणी मुले व मुलींसाठी वसतिगृहही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी सहाय्य व्हावे यासाठी शासनाने त्यांच्यासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आरक्षण उपलब्ध करुन दिले आहे. तसेच काही ठिकाणी मुले व मुलींसाठी वसतिगृहही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याशिवाय या पाल्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शुल्क सवलत व अर्थ सहाय्य दरवर्षी देण्यात येत असते. 

या पाल्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी वैद्यकीय/दंत महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी/ पदविका/ औषधनिर्माण शास्त्र पदविका/पदवी, डीएड व बीएड, माध्यमिक शिक्षण सामाईक या अभ्यासक्रमांमध्ये 5 टक्के आरक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर एमएड, कृषी पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी या अभ्यासक्रमांमध्ये 2 टक्के, मुंबई विद्यापीठाच्या सर्व शाखांमध्ये 3 टक्के तर खाजगी अनुदान प्राप्त, शासकीय विद्यालये/महाविद्यालये व विद्यापीठातील सर्व शाखांमध्ये 10 टक्के एकत्रित संलग्न आरक्षण ठेवण्यात आले आहे.

आजी/माजी सैनिकांच्या मुलांना, मुलींना, पत्नींना, विधवांना शैक्षणिक सवलती देण्यात येतात. यामध्ये राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थेत शिक्षणाच्या सर्व स्तरावर म्हणजेच पहिलीपासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंत फी माफीची सवलत आहे. यामुळे या पाल्यांना शिक्षण फी, सत्र फी, प्रवेश फी भरावी लागणार नाही.

केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्याकडील आरएमडीएफ फंडामधून माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी हवालदार पदापर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल तर केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतंर्गत युद्ध विधवा/विधवा/माजी सैनिक सर्व शौर्य पदक धारक यांचे मुलांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे.

अभ्यासक्रमांची माहिती, त्यानुसार मिळणारे अर्थसहाय्य, वसतिगृहाची क्षमता आणि इतर अनुषंगिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.com या संकेतस्थळास भेट द्यावी.

संपर्कासाठी पत्ता -

सैनिक कल्याण विभाग,
महाराष्ट्र राज्य,
रायगड, राष्ट्रीय युद्ध स्मारका समोर,
घोरपडी, पुणे - 411 001
दूरध्वनी क्र. - 020- 66262605, 66262607
ईमेल - dsw@mahasainik.com


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.