जाहिरात विवरण

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती


महाराष्ट्र राज्यामधून एकूण बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 25 टक्के विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे प्रवेश घेतात. उर्वरित 75 टक्के विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शाखांमधून प्रवेश घेतात. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कला, विज्ञान, विधी शाखांमधून उच्च शिक्षण घेत असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या सोयी व दर्जामध्ये वाढ करण्याच्या हेतूने शासनाने सन 1984 सालापासून शालेय शिक्षण विभागापासून उच्च शिक्षण हा विभाग वेगळा केलेला आहे.

उच्च शिक्षण विभागाचे स्वतंत्र कार्यालय शासकीय मध्यवर्ती इमारत (जुनी), पुणे स्टेशन जवळ, पुणे-1 येथे कार्यरत आहे. उच्च शिक्षण या संज्ञेमध्ये अकृषिक विद्यापीठे व विद्यापीठांशी संलग्नित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व अध्यापक महाविद्यालयांचा समावेश होतो. यामधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.

मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण या प्रशासकीय विभागाकडून उच्च शिक्षण संचालनालयावर देखरेख व नियंत्रण ठेवले जाते. संचालनालय हे महाराष्ट्रातील सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठीचे मुख्य कार्यालय म्हणून काम करते. संचालनालयाच्यावतीने विभागीय स्तरावर दहा सहसंचालक कार्यालये कार्यरत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून इयत्ता बारावी नंतरच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी व पदव्युत्तर अशा पारंपारिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुस्लिम, शिख, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, जैन व ज्यू या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. 

या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी सन 2016-17 साठी विद्यार्थ्यांचे नवीन शिष्यवृत्ती व शिष्यवृत्तीचे नुतनीकरण करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा व अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक त्या सहपत्रांसह महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे विहित मुदतीत सादर करावा. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आवश्यक त्या सहपत्रांसह व विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीत सुरु असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाच्या झेरॉक्स प्रतिसह (ज्यावर बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड नमूद केलेला असावा) तसेच आधार कार्डच्या झेरॉक्स प्रतिसह संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांचेकडे विहित मुदतीत सादर करावेत. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशिल अचूक असणे आवश्यक आहे. बँक खात्याचा तपशील चुकीचा असल्यास अथवा बँक खाते बंद असल्यास शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड त्यांच्या अर्जात नमूद करुन बँक खात्याशी संलग्न केलेले असावे. 

विद्यार्थ्यांनी www.dhepune.gov.in या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन परिपूर्णरित्या भरुन आवश्यक त्या सहपत्रांसह प्राचार्यांकडे सादर करण्याचा कालावधी दि. 20 फेब्रुवारी ते 10 मार्च, 2017 असा आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जाची महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तपासणी करुन अर्जाच्या मूळ प्रति सहपत्रांसह संबंधित सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयाकडे जमा करण्याचा कालावधी दि. 10 मार्च ते 20 मार्च,2017 असा आहे. तर संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांची विहित नमुन्यातील यादी उच्च शिक्षण संचालनालयास जमा करण्याचा कालावधी दि. 20 मार्च ते 25 मार्च, 2017 असा आहे. 

विद्यार्थ्यांनी या योजनेच्या सविस्तर जाहिरात, अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी www.dhepune.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण किंवा उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे यांचा दूरध्वनी क्रमांक 020-26126939 वर संपर्क साधावा. 

पत्ता
उच्च शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, 
पुणे – 411 001.


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.