जाहिरात विवरण

www.mafsu.in पशुवैद्यक व्हा !


महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 3 डिसेंबर, 2000 रोजी नागपूर येथे केली. राज्यातील 4 पशु विद्यापीठातील 5 पशु विज्ञान महाविद्यालये, 1 पदव्युत्तर पशु विज्ञान संस्था आणि 1 दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय यांना एकत्रित करुन हे विद्यापीठ सुरु झाले. 

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठाने लक्षणीय प्रगती केली असून मत्स्य विभाग आणि दुग्ध तंत्रज्ञान विभागांतर्गत नागपूर आणि उदगीर येथे 2 मत्स्य विज्ञान महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तर उदगीर येथेच दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयही स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठात संशोधन, प्रशिक्षण, विस्तार, विद्यार्थी कल्याण, ग्रंथालय यावर विशेष भर देण्यात येतो. 

विद्यापीठाच्या वतीने पशुवैद्यक पदवी (बी.व्ही.एस्सी. ॲण्ड ए.एच.) अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या पदवी अभ्यासक्रमासाठी 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी उमेदवाराने सी.बी.एस.ई. नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या NEET (UG)-2017 या सामाईक प्रवेश परीक्षेस बसणे आवश्यक आहे. 

या अभ्यासक्रमासाठी उमेदवार बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आणि इंग्रजी विषयात खुल्या प्रवर्गाकरिता किमान 50% गुण व आरक्षित प्रवर्गाकरिता किमान 47.5% गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवाराने सी.बी.एस.ई., नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी पात्रता व प्रवेश परीक्षा NEET (UG)-2017 दिलेली असणे अनिवार्य आहे. 

बी.व्ही.एस्सी. ॲण्ड ए.एच. पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश (गोवा राज्य/जम्मू आणि काश्मीर येथील उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागांसहीत) उमेदवाराच्या NEET (UG)-2017 ह्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अनिवासी भारतीय/विदेशी निवासी/भारतीय वंशाचे नागरिक असणारे उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय घेऊन भारतातून उत्तीर्ण झाले असल्यास त्यांना NEET (UG)-2017 ही परीक्षा देणे अनिवार्य आहे, तथापि असे उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा परदेशातून उत्तीर्ण झालेले त्यांना NEET (UG)-2017 ही परीक्षा देणे बंधनकारक राहणार नाही.

परीक्षेसाठी अंतिम अर्ज सादर करण्याचा दि. 01 मार्च, 2017 असा आहे. तर दि. 15 एप्रिल, 2017 रोजी उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. प्रवेश परीक्षा दि. 07 मे, 2017 रोजी होईल. 

विस्तृत माहितीसाठी उमेदवारांनी www.mafsu.in व www.cbseneet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

पत्ता -

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,
फुटाळा तलाव मार्ग,
नागपूर – 440 001 (महाराष्ट्र राज्य)
दूरध्वनी क्रमांक – 0712-2511784
विस्तारीत क्रमांक – 2049/2050
फॅक्स क्रमांक – 0712-2511273


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.