जाहिरात विवरण

बी.एस्सी. ला संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, न्यायसहाय्यक विज्ञान, मानसशास्त्र आणि विधी असे सात विषय शिकवले जातात. बी.एस्सी. ला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान शाखा आणि गणित आवश्यक आहे. एम.एस्सी. ला प्रवेश घेण्यासाठी बी. एस्सी. (फॉरेन्सिक सायन्स) असणे आवश्यक आहे. फॉरेन्सिक सायन्स ॲण्ड रिलेटेड लॉ आणि डिजीटल ॲण्ड सायबर फॉरेन्सिक ॲण्ड रिलेटेड लॉ या दोन एक वर्ष कालावधी असणाऱ्‍या पदव्युत्तर पदविकांसाठी विज्ञान शाखेची पदवी आवश्यक आहे. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती संस्थेच्या http://www.gifsa.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बी.एस्सी. (फॉरेन्सिक सायन्स) ही बारावी नंतरची तीन वर्षांची पदवी आहे. ही पदवी पूर्ण केल्यानंतर दोन वर्षे एम.एस्सी. (फॉरेन्सिक सायन्स) करता येते. डिजीटल ॲण्ड सायबर सायन्स, फॉरेन्सिक केमिस्ट्री, फॉरेन्सिक बायोलॉजी ॲण्ड डीएनए प्रिटींग, एक्झामिनेशन ऑफ क्वश्चन डॉक्युमेंट ॲण्ड फिंगर प्रिंटींग या चारपैकी कोणत्याही एका विषयात ‘स्पेशलायझेशन’ करता येते. या व्यतिरिक्त फॉरेन्सिक सायन्स ॲण्ड रिलेटेड लॉ आणि डिजीटल ॲण्ड सायबर फॉरेन्सिक ॲण्ड रिलेटेड लॉ या पदव्युत्तर पदविका आहेत. ही संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित आहे. मेरिट आणि आरक्षण याद्वारे या संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. बी. एस्सी. साठी 50, एम.एस्सी. साठी 25 तर पदव्युत्तर पदविकेसाठी 40 विद्यार्थी अशी विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.

बी.एस्सी. ला संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, न्यायसहाय्यक विज्ञान, मानसशास्त्र आणि विधी असे सात विषय शिकवले जातात. बी.एस्सी. ला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान शाखा आणि गणित आवश्यक आहे. एम.एस्सी. ला प्रवेश घेण्यासाठी बी. एस्सी. (फॉरेन्सिक सायन्स) असणे आवश्यक आहे. फॉरेन्सिक सायन्स ॲण्ड रिलेटेड लॉ आणि डिजीटल ॲण्ड सायबर फॉरेन्सिक ॲण्ड रिलेटेड लॉ या दोन एक वर्ष कालावधी असणाऱ्‍या पदव्युत्तर पदविकांसाठी विज्ञान शाखेची पदवी आवश्यक आहे. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती संस्थेच्या http://www.gifsa.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आय. टी. इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षा पुरविणे, फार्मासिटीकल कंपन्यांमध्ये रसायनतज्ञ म्हणून, पोलीस खात्यामधील सायबर सेल, मनोरुग्णालयांमध्ये सायको ॲनॅलिस्ट म्हणून, पोलीस प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षक म्हणून, खासगी गुप्तहेर संस्था, ‘फॉरेन्सिक सायन्स’ या विषयाचे प्राध्यापक म्हणून संधी उपलब्ध आहे. तसेच फॉरेन्सिक सायन्स’ या विषयाची पदवी मिळवलेले विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससी या स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस खाते, अन्न व औषध प्रशासन, वकिली, सीआयडी, एनआयए यामध्ये नोकरीची संधी प्राप्त करुन घेऊ शकतात.

बी.ए., बी.एस्सी., इंजिनिअरिंग आणि मेडिकल या रुळलेल्या वाटांकडे न जाता ज्यांना वेगळं काही तरी करण्याची इच्छा आहे त्यांना ‘फॉरेन्सिक सायन्स’ चा चांगला पर्याय उपलब्ध आहे. यात शिक्षण घेऊन तुम्ही देशाला मदत करु शकता. शिवाय संशोधन करुन शास्त्रज्ञ होण्याचा मार्गही आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो…!!

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.