जाहिरात विवरण

संख्या शास्त्रात करिअर संख्या शास्त्र, नैसर्गिक शास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये संशोधन आणि शिक्षण यासाठी विख्यात संख्या शास्त्रज्ञ प्राध्यापक पी.सी.महालनोबीस यांनी दि.17 डिसेंबर, 1931 रोजी कोलकाता येथे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट या संस्थेची स्थापना केली. भारत सरकारने संसदेत 1959 साली कायदा संमत करुन या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा दिलेला आहे. संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे असून दिल्ली, बंगळुर, चेन्नई, तेजपूर येथे 4 केंद्रे आहेत.


स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर, नवी दिल्ली या संस्थेची स्थापना 1941 साली करण्यात आली. प्रारंभी डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर ऑफ दिल्ली पॉलिटेक्निक असे या संस्थेचे नाव होते. नंतर ही संस्था दिल्ली विद्यापिठाला संलग्न करण्यात आली. तद्नंतर भारत सरकारच्या स्कूल ऑफ टाऊन ॲण्ड कन्ट्री प्लॅनिंग या संस्थेत ती समाविष्ट करण्यात आली. समावेशानंतर या संस्थेचे नाव बदलून ते 1959 साली स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर असे करण्यात आले. 

भारत सरकारने 1979 साली या क्षेत्राचे महत्त्व ओळखून शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा दिला. संस्थेच्या वतीने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येतात. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात 20 एकर क्षेत्रात ही संस्था उभी आहे. शहर, नियोजन, रचना, संशोधन, प्रशिक्षण आणि सल्लामसलतीसाठी संस्था प्रसिद्ध असून संस्थेच्या वतीने पीएचडी आणि मास्टर्स अभ्यासक्रम राबविण्यात येतात. संस्थेने नुकतीच मास्टर्स अभ्यासक्रमासाठी घोषणा केली आहे. 2 वर्षे कालावधीच्या मास्टर्स अभ्यासक्रमात : (1) आर्किटेक्चरल कन्झर्वेशन (2) अर्बन डिझाइन (3) डिझाइन (इन्डस्ट्रियल डिझाइन) (4) प्लॅनिंग (5) लॅण्डस्केप आर्किटेक्चर (6) बिल्डिंग इंजिनियरींग ॲण्ड मॅनेजमेंट असे अभ्यासक्रम आहेत. 

प्लॅनिंगच्या अभ्यासक्रमात : (1) एन्वायरमेन्टल प्लॅनिंग (2) हाऊसिंग (3) रिजनल प्लॅनिंग (4) ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग (5) अर्बन प्लॅनिंग असे स्पेशलायझेशन उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची आर्किटेक्चर किंवा प्लॅनिंगमधील पदवी आवश्यक आहे. 

आर्किटेक्चरल कन्झर्वेशन ॲण्ड अर्बन डिझाइन या अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची आर्किटेक्चर किंवा प्लॅनिंग मधील पदवी आवश्यक आहे. एन्वायरमेंट प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी आर्किटेक्चर ॲण्ड प्लॅनिंग किंवा सिविल इंजिनियरींग किंवा आर्किटेक्चरल इंजिनियरींग किंवा एन्वायरमेन्टल इंजिनियरींग किंवा भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पर्यावरण शास्त्र, पर्यावरण व्यवस्थापन यापैकी एका विषयातील मार्स्टसची पदवी आवश्यक आहे. रिजनल प्लॅनिंग ॲण्ड अर्बन प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर किंवा सिविल इंजिनियरींग किंवा आर्किटेक्चरल इंजिनियरींग किंवा भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापिठाची मार्स्टसची पदवी आवश्यक आहे. हाऊसिंग या अभ्यासक्रमासाठी प्लॅनिंग किंवा आर्किटेक्चर किंवा सिविल इंजिनियरींग किंवा आर्किटेक्चरल इंजिनियरींग किंवा म्युनिसिपल इंजिनियरींग किंवा बिल्डिंग इंजिनियरींग किंवा समाजशास्त्र, अर्थशास्त्र यातून मान्यताप्राप्त विद्यापिठाची मास्टर्सची पदवी आवश्यक आहे. ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी प्लॅनिंग किंवा आर्किटेक्चर किंवा सिविल इंजिनियरींग किंवा आर्किटेक्चरल इंजिनियरींग यामधील पदवी किंवा स्टॅटिस्टिक/ऑर्पेशनल रिसर्च/ अर्थशास्त्र या विषयातील मार्स्टसची पदवी आवश्यक आहे. लॅण्डस्केप आर्किटेक्चर या अभ्यासक्रमासाठी लॅण्डस्केप आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्चर किंवा प्लॅनिंग यामधील पदवी किंवा प्लॅनिंगमधील मार्स्टस डिग्री किंवा प्री-लॅण्डस्केप आर्किटेक्चर यामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बिल्डिंग इंजिनियरींग ॲण्ड मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी सिविल इंजिनियरींग किंवा बिल्डिंग किंवा आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्चर इंजिनियरींग किंवा बिझनेस सायन्स किंवा 5 वर्ष कालावधीचा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील पदविका असणे आवश्यक आहे. डिझाईन (इंडस्ट्रियल डिझाईन) या अभ्यासक्रमासाठी आर्किटेक्चर मधील पदवी किंवा डिझाईन इंजिनियरींग/डिझाईन/ फाईन आर्टस या मधील पदवी असणे आवश्यक आहे. 

उमदेवारांनी किमान 55 टक्के गुणांसह उपरोक्त पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावेत. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गासाठी किमान 50 टक्के गुण असावेत. केंद्र शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गासाठी जागांचे आरक्षण उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 09 मार्च, 2017 असा आहे. संस्थेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी JEE-2017 च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येईल. 

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया www.spa.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा admission@spa.ac.in या ईमेलवर अथवा 011-23724383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 

संस्थेचा पत्ता :
स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर, नवी दिल्ली,
4, ब्लॉक-बी, इंद्रप्रस्थ इस्टेट,
नवी दिल्ली – 110 002


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.