जाहिरात विवरण

Test


रायबरेली - सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मोदींना चौकीदार चोर है म्हटल्याप्रकरणी माफी मागून काही वेळ उलटत नाही तोच काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माझ्यासोबत केवळ 15 मिनिटे बोलावे, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असे आव्हान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिले. 

रायबरेली येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की,''नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माझ्यासोबत 15 मिनिटे चर्चा करावी, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. मात्र या चर्चेनंतर नरेंद्र मोदी हे देशाला आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत.''

 दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेठी येथे पुन्हा एकदा चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या. गेल्या पाच वर्षांत चौकीदाराने तुमच्याकडील बऱ्याच गोष्टी चोरल्या. त्यांनी फूड पार्क, रुग्णालय, शाळा सर्व तुमच्याकडून काढून घेतले. आता माझे सरकार आल्यावर मी तुम्हाला सर्व दुप्पटीने परत करीन.''  


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.