जी.डी.आर्ट पदविका प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
या अभ्यासक्रमांमध्ये रेखा व रंगकला 4 वर्ष, उपयोजित कला 4 वर्ष, शिल्पकला व प्रतिमानबंध 4 वर्ष, अंतर्गत गृहसजावट 2 वर्ष, वस्त्रकाम (टेक्सटाईल) (प्रिंटीग अँड विविंग) 2 वर्ष, मातकाम (सिरॅमिक व पॉटरी) 2 वर्ष, आणि कला शिक्षणशास्त्र पदविका डिप.ए.एड 1 वर्ष या अभ्यासक्रमांची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होईल.
विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी तसेच प्रवेश संबंधीच्या पुढील नियोजित तारखा http://cetcell.net/doa/ तसेच www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील असे कला संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Helpline 9975603050 www.mundejobs.com Munde Sir Aurangabad
9975603050