जाहिरात विवरण

विमा विषयात उच्च शिक्षण हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना विविध शासकीय, खाजगी विमा कंपन्या, बँका, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांमध्ये तसेच स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च, 2017 अशी आहे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या www.niapune.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी. www.niapune.org.in


भारत सरकारच्या वित्त मंत्रालय आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, द न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 16 डिसेंबर, 1980 रोजी मुंबई येथे नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमीची स्थापना करण्यात आली. दि. 04 जून, 1990 पासून या अॅकॅडमीचे स्थलांतर पुणे येथे करण्यात आले आहे. विमा क्षेत्रात संशोधन करणे, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, सल्लामसलत करणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. पुणे येथे जवळपास 32 एकर जागेत संस्था उभारण्यात आली आहे. या परिसरात प्रशासकीय शैक्षणिक इमारती, वसतिगृह, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, बँक, पोस्ट ऑफिस, दवाखाना, क्रिडांगण, व्यायामशाळा, तरंगतलाव आदि अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.

संस्थेने नुकतीच 2 वर्षे पूर्ण वेळ कालावधीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट प्रोग्राम या अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले आहेत. हा अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या यापूर्वीच्या उमेदवारांना करिअरची उत्कृष्ट संधी मिळालेली आहे.

या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी कुठल्याही विषयातील पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. पदवी परीक्षेच्या अंतिम परीक्षेला बसलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. 01 जुलै, 2017 रोजी उमेदवाराचे वय खुला प्रवर्ग, इतर मागासवर्ग यांच्यासाठी 26 वर्षापर्यंत तर अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग उमेदवारांसाठी 28 वर्षे इतके आहे.

या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची निवड त्यांची शैक्षणिक कारकिर्द 2016 च्या सीएटी किंवा 2017 च्या सीएमएटी परीक्षेतील गुणांकन, समूहचर्चा आणि समकक्ष मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. भारत सरकारच्या आरक्षणाच्या धोरणानुसार विविध संवर्गासाठी आरक्षण उपलब्ध आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांना, मुलींना तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील व अन्य मागासवर्गातील उमेदवारांसाठी शिष्यवृत्ती मिळू शकते. 

हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना विविध शासकीय, खाजगी विमा कंपन्या, बँका, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांमध्ये तसेच स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते. 

या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च, 2017 अशी आहे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या www.niapune.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी.


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.