जाहिरात विवरण

*जनहितार्थ जारी* विद्यार्थी मित्रांनो...... तुम्हा सर्वांना नमस्कार, मी प्रा. डॉ. नितीन प्रकाशराव पाटील, आपल्या सर्वांचे जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वागत करतो. मी आशा करतो आपण सर्व सुरक्षित व निरोगी असाल. मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे कि, जल व भूमी व्यवस्थापन विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. तुमच्यापैकी बरेच जण यशस्वी करिअर करण्यासाठी उत्सुक असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर *उस्मानाबाद येथे आशिया खंडातील एकमेव जल व भूमी व्यवस्थापन विभाग कार्यान्वित आहे,* हे आपल्यापैकी खूप थोड्या लोकांना माहिती असेल. या विभागाद्वारे विद्यार्थ्यांना नैसर्गिक संसाधन  व्यवस्थापनाचे शिक्षण दिले जाते. शेती, पर्यावरण, उद्योजकता आदी विषयात रस असणारे विद्यार्थी प्रत्यक्ष विभागात भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी पात्र आहे. आभार, प्रा. डॉ. नितीन प्रकाशराव पाटील, एम.टेक (मृदा व जल संधारण अभियांत्रिकी), नेट, पी.एच.डी (स्थापत्य अभियांत्रिकी) सहयोगी प्राध्यापक तथा विभागप्रमुख, जल व भूमी व्यवस्थापन विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद. https://online.bamu.ac.in/unic/pg-admission-2020/ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणीसाठी खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या फाइल्स सोबत ठेवाव्यात. 1. छायाचित्र 2. स्वाक्षरी 3. S.S.C. गुणपत्रक 4. H.S.C. गुणपत्रक 5. U.G. गुणपत्रक 6. रहिवासी प्रमाणपत्र 7. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 8. जात प्रमाणपत्र 9. जात पडताळणी प्रमाणपत्र 10. इतर संबंधित प्रमाणपत्र (अपंगत्व प्रमाणपत्र, मायनॉरिटी प्रमाणपत्र इत्यादी) *नोंदणीसाठी शेवट तारीख* :- ०८ जानेवारी २०२१ संपर्क :- 9766693812, 9604237779


9766693812


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.