तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींना राहण्यासाठी ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
Published By : mundejobs.com
जिल्हा परिषदांच्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये सुधारणा. तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींना राहण्यासाठी ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुलींना जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणासाठी ६०० रुपयांऐवजी १ हजार रुपये मिळणार. सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणकाबाबतचे ज्ञान-कौशल्य मिळविण्यासाठी आता कुटुंबाच्या उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपये. अतितीव्र कुपोषणमुक्त गावाला मिळणार ५० हजारांचे बक्षीस.
सविस्तर माहितीसाठी - https://www.mahasamvad.in/?p=29995
9762020104