जाहिरात विवरण

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना


अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जातात. या योजनेचा फायदा विद्यार्थी, महिला याबरोबरच सर्वसामान्य जनता यांना होत असतो. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहे. आज आपण अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता असणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती घेऊ.

अल्पसंख्याक समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षण देणे, त्यांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.

योजनेचा लक्ष्यगट
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उच्च व तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यामध्ये अंतर्भूत आहेत. 

योजनेचे उद्दिष्ट
अल्पसंख्याक समाजातील होतकरू व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षण घेण्यास प्रेरीत करणे यासाठी ही योजना राबविण्यात येते.
या योजनेंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असेल त्या अभ्यासक्रमासाठी आकारण्यात आलेल्या वार्षिक शैक्षणिक शुल्क किंवा 25 हजार रुपये. (वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रम/तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी) 
पाच हजार रुपये (इयत्ता 12 वीनंतरचे अभ्यासक्रम उदा. कला, वाणिज्य व विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी) यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते. 
योजनेसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे सर्व स्तोत्राद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे व विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ईसीएस पद्धतीद्वारे थेट जमा करण्यात येते.

भौतिक उद्दिष्ट
दरवर्षी वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी 2,500/- नवीन शिष्यवृत्ती, तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी 15,000/- नवीन शिष्यवृत्ती व इयत्ता 12 वीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी (कला, वाणिज्य व विज्ञान) 2,000/- नवीन शिष्यवृत्ती तसेच नुतनीकरणासाठी प्राप्त सर्व अर्जानुसार सर्व अभ्यासक्रमासाठी सर्व विद्यार्थांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे. 

योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक यांच्याद्वारे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. तर मग अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनो लागा तयारीला...या योजनेचा लाभ घेण्यासाठी


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.